विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर, ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा करत फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली. जयंत पाटील म्हणाले, सरकारचं फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारं विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर दाखवण्यात आलंय
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा करत फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार असल्याचे जाहीर केलं. तर राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिनाभरात देणार असल्याने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे म्हटलंय. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली. जयंत पाटील म्हणाले, सरकारचं फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारं विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर दाखवण्यात आलंय. तर आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर न देता त्यांनी अनेक गंभीर मु्द्यांना बगल दिल्याचे जयंत पाटील म्हटलंय. गेले काही महिने मराठ्यांचा आग्रह होता की, २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, यासाठी सरकार अपयशी असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटलंय.