Maharashtra Budget 2024 : ‘जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने’, माजी अर्थमंत्र्यांकडून महायुती सरकारच्या बजेटची चिरफाड

| Updated on: Jun 28, 2024 | 5:29 PM

महायुती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आल्या आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीसरकारवर जोरदार टीका केली आहे

Follow us on

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आल्या आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीसरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘पराभव होण्याच्या भितीने या सरकारने भरमसाठ घोषणा केल्या आहेत.’, असे जयंत पाटील म्हणाले तर देशातील लोकसभा निवडणुकीचा मोठा फटका आहे की मराठी एक म्हण आहे. जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने… आता चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरूवात केली असल्याचे म्हणत खोचक टोला लगावला आहे.