VIDEO : Jayant Patil | कायद्याच्या चौकटीत आंदोलन करण्याचा मनसैनिकांना आदेश
मुंबई येथील सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्रदिनी भाजपने घेतलेल्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक तेथे नव्हते असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीदेखील आज फडणवीसांवर अशी उपरोधिक टीका केली आहे.
बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली तेव्हा मी स्वतः त्यांच्या सोबत होतो, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? त्यावेळी 13 वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणी बाबरी मशीद पाडायला गेले का? तसं असेल तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून त्यांच्यावरही केस होईल.. हे प्रकरण गंभीर आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. मुंबई येथील सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्रदिनी भाजपने घेतलेल्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक तेथे नव्हते असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीदेखील आज फडणवीसांवर अशी उपरोधिक टीका केली आहे.