Jayant Patil | राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर
माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील रुग्णालयाकडे रवाना झाले होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी स्वत: जयंत पाटील यांनी एक ट्वीट करुन आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Published on: Jul 28, 2021 08:29 PM
Latest Videos