याआधी अनेक चोऱ्या झाल्या असतील पण आता अख्खा पक्षच चोरीला गेलाय; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिंदेगटावर निशाणा
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. पाहा...
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. “आजवर अनेक चोऱ्या झाल्या असतील. पण पक्षाची चोरी झाली हे कधी ऐकलं होतं का? पण आता अख्खा पक्ष चोरीला गेलाय. प्रत्येकाला सांगायला हवं हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका प्रत्येक मतदाराना सांगा. उध्दव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह चोरलं. महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही. एक संघ राहून भाजपला विरोध केला पाहिजे. आपली मते फुटली नाहीत पाहिजेत. अनेक ठिकाणी आम्ही विनंती केली पोटनिवडणुक बिनविरोध करा, तेव्हा ऐकलं नाही. तरिही पंढरपूर वगळता आपण सगळ्या पोटनिवडणुका जिंकल्या”, असं जयंत पाटील म्हणालेत.
Published on: Feb 21, 2023 08:43 AM
Latest Videos