उदय सामंतांनी राष्ट्रवादी का सोडली होती? जयंत पाटील म्हणतात, “त्यांना विचारा…”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना टोला लगावला आहे. हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. यावर जंयत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांना टोला लगावला आहे. हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. यावर जंयत पाटील यांनी भाष्य केलं आहे. उदय सामंतांनी हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असे ते बोलतात. मग राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत का गेले होते? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे. सामंत कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे मला चांगलं माहित आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. प्रत्येक पक्षांतरावेळी उदय सामंत वेगवेगळी कारणं देत असतात, असं देखील जयंत पाटील म्हणाले.
Published on: Jun 06, 2023 08:33 AM
Latest Videos