Jayant Patil | दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री राहणार : जयंत पाटील
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहतील, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. इंदापूरला सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी देण्यावरुन वाद निर्माण झाला होता.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बैठक सुरु आहे. या बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री राहतील, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. इंदापूरला सोलापूरच्या उजनी धरणातील पाणी देण्यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. दत्तात्रय भरणे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. सोलापूर जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना भेटण्याची वेळी मागितली होती. त्यांनी सोलापूरच्या पक्षसंघटनेबाबत चर्चा करण्यात आली आहे. उजनीच्या पाण्याबद्दलचा वाद संपला आहे. सोलापूरच्या विकासाबद्दल चर्चा झाली, आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
Latest Videos