Maharashtra Band | लखीमपूर घटनेमुळे भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट : जयंत पाटील
अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात बऱ्यापैकी बंद आहे. लखीमपूरच्या घटनेच्याविरोधात राज्यातला नागरिक पेटून उठला आहे. भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. आज त्याच संतापाला वाट मोकळी देत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात बऱ्यापैकी बंद आहे. लखीमपूरच्या घटनेच्याविरोधात राज्यातला नागरिक पेटून उठला आहे. भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. आज त्याच संतापाला वाट मोकळी देत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. लखीमपूरची जी घटना झाली, त्यात शेतकऱ्यांना चिरडून मारलं गेलं. परंतु त्याचा साधा निषेधही पंतप्रधान मोदी, भाजपचे आमदा-खासदार करताना दिसत नाहीत, असंही जयंत पाटील म्हणाले.
Latest Videos