देवेंद्र फडणवीस की पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे, जयंत पाटलांकडून फडणवीसांची फिरकी
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. Jayant Patil Devendra Fadnavis
मुंबई:देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेले पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटला रिप्लाय देताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फिरकी घेतली.
देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?, असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यावर काय बोलणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Latest Videos