…म्हणून माझ्या लग्नाची वरात काढली नाही, जयंत पाटील यांनी सांगितला भन्नाट किस्सा
पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. "माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती" अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी यावेळी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल बीड जिल्ह्यात होते. काल संध्याकाळी ते परळीत पोहोचले. त्यावेळी त्यांचं प्रचंड जंगी स्वागत करण्यात आलं. परळीकरांनी केलेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे जयंत पाटीलही भारावून गेले होते. माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्व सुरू झालं आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाले.
धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी ज्या जल्लोषात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते, अगदी त्याच जल्लोष व धो धो पडत असलेल्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. “माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती” अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी यावेळी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.