भाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

भाजपनंच 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

| Updated on: Dec 05, 2021 | 11:11 AM

पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाने 180 एमएलटी पाणीकपात पुणेकरांना सहन करायला लावली, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

पुणे : शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पाणीप्रश्नावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचं दिसतंय. शुक्रवारी पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव न घेता पाण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. ‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांवर निशाणा साधला होता. त्यावर आत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्याच्या पाणी कपातीबाबत महाराष्ट्र सरकारचा किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पालिकेला देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी 11 पत्र देण्यात आली होती. त्यांनी 180 एमएलडी पाणी बंद केलं होतं. असं आमचं धोरण नाही. त्यांनी काल येऊन सांगितलं मात्र पाणी कपातही त्यांनीच केली होती. त्यांनाच पुणेकर धडा शिकवतील. 180 एमएलडी पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.