”खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर…”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीनं सुजय विखेंना भरला दम
‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालंय, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असं वक्तव्यच करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. या टीकेवर जयश्री थोरात यांनी पलटवार केलाय.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते सुजय विखे पाटील यांची संगमनेर येथे सभा पार पडली. यावेळी सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला होता. सुजय विखे पाटील यांनी संगमनेरातील सभेच्या आरोपानंतर बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. ‘संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचे स्वाभिमान आहे. त्यामुळे खबरदार माझ्या बापाबद्दल तुम्ही काहीही बोलाल तर याद राखा’, असा सज्जड दमच जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांना भरला. पुढे त्या असेही म्हणाल्या, ज्यांना स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार ? असा सवाल देखील जयश्री थोरातांनी यावेळी केला. युवा संवाद यात्रेच्या जोर्वे येथील सभेत जयश्री थोरातांनी सुजय विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
