जबरदस्तच….पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची सुबक मूर्ती, जगातील सर्वात लहान मूर्ती साकारणारा अवलिया कोण?
नाशिक मधील आयटी इंजिनियर जीवन जाधव या युवकाने चक्क पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची सुबक मूर्ती साकारली आहे, मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली असून 1.5 सेंटीमीटर आकाराची ही मूर्ती बहुदा जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा
नाशिक, १५ फेब्रुवारी २०२४ : आयोध्यात रामल्लला विराजमान झाल्यापासून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रामलल्ला प्रति आपली श्रद्धा अर्पण केलीय, अशात नाशिक मधील आयटी इंजिनियर जीवन जाधव या युवकाने चक्क पेन्सिलच्या टोकावर रामलल्लाची सुबक मूर्ती साकारली आहे, मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली असून 1.5 सेंटीमीटर आकाराची ही मूर्ती बहुदा जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा जीवन यांनी केला आहे. जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलच्या लीडवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, ए पी जे अब्दुल कलाम, लालबागचा राजा, महेंद्रसिंग धोनी, सरदार वल्लभभाई पटेल, मायकल जॅक्सन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती, विठ्ठल मूर्ती, नाना पाटेकर अशा शंभरहून अधिक सुबक मुर्ती साकारल्या आहेत.
जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकावर विविध देवदेवता, महापुरुष,भारतीय संस्कृती,समाज सुधारक,खेळाडू राजकीय नेते यांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत,या सह त्याने एकाच पेन्सिलवर इंग्रजीतील ए टू झेड अक्षरे काढली आहे,पेन्सिलच्या शिसावर 93 कडीची साखळी तयार करण्याचा विक्रम देखील केला आहे,या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे, जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती काढण्याचा विक्रम जीवन यांच्या नावावर आहे,