JIO Network Down : बोलता-बोलता तुमचाही फोन कट… जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
मुंबईमध्ये अचानक गेल्या तासाभरापासून जिओचं नेटवर्क डाऊन झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिओचं नेटवर्क डाऊन झाल्याने कॉल आणि इंटरनेट सेवेतही खंड पडला आहे. त्यामुळे युजर्सने एकच संताप व्यक्त केला आहे.
तुम्हीही जिओचे ग्राहक आहात? तुम्हीही फोनवर बोलत असताना अचानक तुमचा आवाज समोरच्यापर्यंत पोहोचण्यास समस्या आली? फोनवर बोलता-बोलता अचनाक फोन कट झाला? इंटरनेट ठप्प झालं? भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक रिलायन्स जिओचे नेटवर्क गेल्या तासाभरापासून ठप्प झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्यामुळे जिओ युजर्सना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतोय. तर अनेकांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत रिलायन्स जिओला टॅग करून रिलायन्स जिओचं नेटवर्क गेल्या 1 तासापासून डाऊन असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. नेटवर्क डाऊन का झाले? अद्याप रिलायन्स जिओने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे युजर्स नेटवर्क कधी सुरळीत होणार याबाबत सोशल मिडीयावर टॅग करून विचारणा करताना दिसताय. तर सोशल मीडियावर जिओ डाऊन हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लोक या ट्रेंडमध्ये सहभागी होऊन जिओ आणि अंबानी यांना ट्रोल करतांना दिसताय.
Mukesh Ambani naraaz hai #JioDown #JioOutage #Mumbai
— Miss Ordinaari (@shivangisahu05) September 17, 2024