गोळी झाडून घेतली असती! शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका; म्हणाला, ‘सत्ता हेच सर्वस्व...’

गोळी झाडून घेतली असती! शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी नेत्याची सडकून टीका; म्हणाला, ‘सत्ता हेच सर्वस्व…’

| Updated on: Jun 22, 2023 | 11:55 AM

जर बंड फसला असता तर त्यांनी तिथेच डोक्यात गोळी झाडून घेतली असती असा गौप्यस्फोट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. ज्यानंतर राज्यात याचीच चर्चा सुरू होती.

नागपूर : एक वर्षांपुर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि 50 आमदार घेऊन बाहेर पडले. यावेळी जर बंड फसला असता तर त्यांनी तिथेच डोक्यात गोळी झाडून घेतली असती असा गौप्यस्फोट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. ज्यानंतर राज्यात याचीच चर्चा सुरू होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना आधी पोलीसांनी दीपक केसरकर यांना ताब्यात घेतलं पाहिजे अशी मागणी केली होती. त्यानंतर आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे. त्यांनी, सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता मिळाली नाही, तर मी माझ्या जीवाचं काही करून घेईन असं म्हणणं बरोबर नाही. तर सत्ता हे सर्वस्व नसतं. लोकशाहीत तुम्हाला जनतेच्या समोर जावं लागतं. जय पराजय हा आयुष्यातला अविभाज्य घटक असल्याचं म्हणत टोला हाणला आहे. maharashtra politics

Published on: Jun 22, 2023 11:42 AM