‘बीजेपीच्या नेत्याचा सातबारा, भलत्याच महिलेच्या नावावर’; आव्हाड यांचा सोमय्या यांच्यावरून हल्लाबोल
विरोधकांनी भाजपसह किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाना साधला. तर सोमय्या जर मागणी करत असलतील तर या प्रकरणी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी लावून धरली. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. तर राज्याचे पावसाळी अधिवेशन देखील याच विषयावरून गाजले. विरोधकांनी भाजपसह किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाना साधला. तर सोमय्या जर मागणी करत असलतील तर या प्रकरणी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी लावून धरली. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावरून ट्विट करत, राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही असं म्हटलं आहे. तर मी 1995 साली शरद पवार यांच्याकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. त्यावेळी मी, पवार यांना याचा राजकीय फायदा होऊ शकतो असं म्हटलं होतं. मात्र यावेळी पवार यांनी सातबारा काढून घेत, राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, ते वैयक्तीक जीवनामध्ये न्यायचे नसतात. असा विचार पुढे कधीच करू नकोस आपण एवढं खाली घसरायचं नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं.