हस्तांदोलन ते हास्य विनोद... विधान भवनाच्या पायऱ्यांवर अचानक भेट?; 'या' दोन नेत्यांच्या भेटीत दडलंय काय?

हस्तांदोलन ते हास्य विनोद… विधान भवनाच्या पायऱ्यांवर अचानक भेट?; ‘या’ दोन नेत्यांच्या भेटीत दडलंय काय?

| Updated on: Jun 27, 2024 | 5:04 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अशातच विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले तर विधान भवनाच्या परिसरात पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आणि संतोष बांगर यांनी हस्तांदोलन केलं आणि....

आजपासूनच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असून यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अशातच विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले. एक म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला. तर दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आज विधान भवनाच्या परिसरात पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आणि संतोष बांगर यांनी एकमेकांशी एकदम मनमोकळ्या गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ

Published on: Jun 27, 2024 05:04 PM