शरद पवार हेच राष्ट्रवादीचे बिगबॉस, निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘सेनापती पुन्हा…’
VIDEO | शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या पक्षातच अस्वस्थता, मात्र निर्णय मागे घेताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, जितेंद्र आव्हाड म्हणाले...
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षातच अस्वस्थता निर्माण झाली होती. यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्यानंतरही राष्ट्रवादीतून राजीनामा देण्याचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये कार्यकर्त्यासह बडे नेते, जितेंद्र आव्हाज यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र समितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आव्हाड म्हणाले, सेनापतीशिवाय सैन्य लढू शकत नाही. सैन्य लढायला उतरलं होतं मात्र सेनापतीने सांगितलं मी आता सेनापती नाही. सेनापती नसता तर युद्ध लढता आलं नसतं..पण आता आनंद आहे. सेनापती पुन्हा रणांगणात आले आहेत. त्यामुळे आता बघुया रणांगणात काय होतंय असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना इशाराही दिलाय.