प्रभू श्रीराम भाजपासाठी फक्त पॉलिटिकल टूल, अमित शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून कुणाचा हल्लाबोल?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेश निवडणूक आणि भाजपला मत द्या अयोध्येतील रामाचं दर्शन मोफत घडवू, असे वक्तव्य केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. भाजपने श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय'
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेश निवडणूक आणि भाजपला मत द्या अयोध्येतील रामाचं दर्शन मोफत घडवू, असे वक्तव्य केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. भाजपने श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. अमित शाह यांनी केलेले विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं आहे. संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरलेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडविण्याचे आमिष दाखवलं जातंय, असा हल्लाबोलही केलाय. श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणं हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटलंय.