निवडणूक आयोग विसरभोळं आणि खोटारडं...? जितेंद्र आव्हाड यांचे 'ते' 4 आक्षेप कोणते?

निवडणूक आयोग विसरभोळं आणि खोटारडं…? जितेंद्र आव्हाड यांचे ‘ते’ 4 आक्षेप कोणते?

| Updated on: Feb 07, 2024 | 2:31 PM

आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून एकच हल्लाबोल करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी चार आक्षेपही घेतले आहे.

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेसवर अखेर निकाल जाहीर केला. आयोगाने अजित पवार गटाकडे पक्ष आणि चिन्ह सोपावले आहे. तर या निर्णयानंतर शरद पवार गटाकडून एकच हल्लाबोल करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी चार आक्षेपही घेतले आहे. निवडणूक आयोग खोटं बोलतंय नाहीतर ते विसरभोळे तरी आहेत. अजित पवार गट म्हणतो २०१९ पासून पक्षात मतभेद आहेत. मग पदं कशी उपभोगली? असा आक्रमक सवालही जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केला आहे. तर ३० जूनच्या बैठकीचा संदर्भ अजित पवार गटाकडून लपवला जातोय, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हणत आयोगाच्या निकालावर हल्लाबोल केलाय.

Published on: Feb 07, 2024 02:31 PM