जितेंद्र आव्हाड यांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

| Updated on: Jun 05, 2022 | 3:05 PM

नवी मुंबईच्या सुजाण जनतेने सत्तेवर आणले ते काय वृक्ष कापायला? जेव्हा ठराव पास केला तेव्हा झाडे नाही दिसली का, असा सवाल त्यांनी केला. तो माणूस स्वार्थाचा आहे. त्याने माफी मागायला पाहिजे. कसली नाटके हे करत आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईत ते बोलत होते. “ठराव 2008चा आहे. येथे उड्डाणपूल बांधण्याचा ठराव येथील बादशहा समजणारे नाईक यांचा आहे. आता आम्ही जाहीर केल्यानंतर का ओरडत आहात. आम्ही 15 दिवस आधी मोर्चा काढला म्हणून तुम्हाला आठवले का? पाप मनात खात असते. नवी मुंबईच्या सुजाण जनतेने सत्तेवर आणले ते काय वृक्ष कापायला? जेव्हा ठराव पास केला तेव्हा झाडे नाही दिसली का,” असा सवाल त्यांनी केला. तो माणूस स्वार्थाचा आहे. त्याने माफी मागायला पाहिजे. कसली नाटके हे करत आहेत, अशीही टीका त्यांनी केली.