Jitendra Awhad | उत्पल पर्रिकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची ऑफर
जितेंद्र आव्हाड यांनी उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवर महत्वाचं वक्तव्य केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकर यांना आपमध्ये प्रवेशाची ऑफर दिलीय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ते अपक्ष लढल्यासही पाठिंबा देण्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार उडी घेण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि जितेंद्र आव्हाड आज गोवा दौऱ्यावर आहेत. अशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उत्पल पर्रीकरांच्या उमेदवारीवर महत्वाचं वक्तव्य केलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकर यांना आपमध्ये प्रवेशाची ऑफर दिलीय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उत्पल यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर ते अपक्ष लढल्यासही पाठिंबा देण्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे.
भाजपचा मला तुटलेला दुवा इथे दिसतोय की, ते पाया गमावत आहेत. जे काँगेसने वाढवले (बाबुश मोंसेरात) ते पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते भाजपचे काय होणार? पण जे पर्रीकर गोव्याच्या घराघरात दिसले. कुठेही चणे खात उभे राहायचे, फिश मार्केट मध्ये फिरायचे, स्कुटरवर फिरायचे, त्यांना गोवन आपला मानायचा. अचानक भाजपने फॉर्म्युला लावावा की नेत्याच्या मुलाला तिकीट देता येणार नाही, हे चुकीचे आहे. काम दाखवावे लागेल हे ठीक आहे. पण आपण भारतीय संस्कृतीत राहातो. पर्रीकर यांच्याविषयी त्यांच्या मतदार संघात असलेली सहानुभूती ती काहीही बोललात तरीही नाकारता येणार नाही. उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मी येत्या एक दोन दिवसात त्यांना भेटून आमंत्रणही देईन की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं सांगत भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाण्याचे संकेत आव्हाड यांनी दिले आहेत.