Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीनं चर्चांना उधाण

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीनं चर्चांना उधाण

| Updated on: Jun 24, 2021 | 4:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालाची वेग आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकी राजकीय नसल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या घरांबाबत चर्चा करण्यासाठी हे दोन्ही नेते भेटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंदर्भात पत्र लिहले होते. त्यावरच आव्हाड आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. ही बैठक तब्बल अडीच तास सुरु होती. त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.