रायगडावरील सनातन धर्माच्या शपथेवरून जितेंद्र आव्हाड यांची टीका; म्हणाले,  शिवरायांचा राज्याभिषेक...

रायगडावरील सनातन धर्माच्या शपथेवरून जितेंद्र आव्हाड यांची टीका; म्हणाले, “शिवरायांचा राज्याभिषेक…”

| Updated on: Jun 02, 2023 | 3:49 PM

शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा का? रायगडावरील सनातन धर्माच्या शपथेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या सोयीनुसार रायगडावर विचार मांडले असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

ठाणे : शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा का? रायगडावरील सनातन धर्माच्या शपथेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या सोयीनुसार रायगडावर विचार मांडले असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. शिवाजी महाराज यांना काय पसंत होतं तेच रायगडावरून जाहीर व्हायला पाहिजे होतं. तुम्हाला काय आवडतं, तुमच्या राजकारणाला काय हिताचं आहे, राजकारणासाठी कोणत्या धर्माची मदत होईल, तो धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म नव्हे.शिवरायांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्यांनी आम्हाला धर्म शिकवायचा का?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Published on: Jun 02, 2023 03:49 PM