शिवसेनेत व्हीप कोणाचा लागू होणार? जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं, हमको शॉक...

शिवसेनेत व्हीप कोणाचा लागू होणार? जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं, “हमको शॉक…”

| Updated on: May 30, 2023 | 9:08 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवीन व्हीप नेमण्याच्या तयारीला लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या पक्षाचा कायदेशीररित्या व्हीप लागू होणार यावर भाष्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं प्रेझेंटेशन दिलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नवीन व्हीप नेमण्याच्या तयारीला लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या पक्षाचा कायदेशीररित्या व्हीप लागू होणार यावर भाष्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड सातत्याने सर्वोच्च न्यायालयाचा निकास समजवत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं प्रेझेंटेशन दिलं आहे. आणि त्यांनंतर त्यांनी मीडियासमोर स्पष्टीकरणही दिलं आहे. ” केवळ सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होऊ शकतो. तेव्हा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडे होता, त्यामुळे गटनेता म्हणून अजय चौधरी यांची निवड कायदेशीर आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. आमदारांनी व्हीपकडून आलेल्या ऑडरचे पालन करून वागायचे असते. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की व्हीप आणि गटनेता पक्ष प्रमुखच पाहतो.व्हीप हेच पक्ष प्रमुख आणि पक्षाचे मत आमदारांना कळवतात”, संपूर्ण निकाल 20 दिवस वाचून त्याचा आभ्यास करून हे प्रेझेंटेशन केलेलं आहे, त्यामुळे रिझनेबल वेळेत निपक्षपातीपणे अध्यक्षांना निकाल द्यावाच लागेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

Published on: May 30, 2023 09:08 AM