मुंब्र्यातील मदरशांत दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन : जितेंद्र आव्हाड

मुंब्र्यातील मदरशांत दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Apr 03, 2022 | 7:11 PM

ज्या घरात जन्माला आला तुम्ही त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

काहीजणांना सूत्र हातात घ्यायची नाहीत,त्यांना असा कोणीतरी लागतो पुढे पुढे करण्यासाठी माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. तुम्हाला वेळ असेल तेव्हा सकाळी लवकर उठून या मुंब्र्यात किंव्हा स्वतः कधीही घुसा मुंब्र्यात जा कुठल्यातरी मदरशाच्या घरात ..विदाऊट पोलीस प्रोटेक्शन एक वस्तारा शोधून काढा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. लाखांच्या सभा समोर टाळ्या घेण्यासाठी बोलनं फार सोपं असतं, पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ज्या घरात जन्माला आला तुम्ही त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.