Special Report | विधानसभेत Dilip Walse Patil आणि Devendra Fadnavis यांची जुगलबंदी

| Updated on: Mar 15, 2022 | 12:31 AM

फडणवीसांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या या आरोपांना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर दिलं.

मुंबई : गिरीश महाजन (Girsih Mahajan) आणि विरोधकांना विविध प्रकरणात गोवण्यासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकार षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेती व्हिडीओ बॉम्ब टाकला. यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचा समावेश आहे. फडणवीसांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी फडणवीसांनी केली होती. फडणवीसांच्या या आरोपांना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीसांची मागणी फेटाळून लावत हे प्रकरण सीबीआय ऐवजी सीआयडीकडे देण्याची घोषणा केलीय.