VIDEO : Aryan Khan Bail | आर्यन खानला जामीन मिळणार, अभिनेत्री Juhi Chawla ची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : Aryan Khan Bail | आर्यन खानला जामीन मिळणार, अभिनेत्री Juhi Chawla ची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 29, 2021 | 6:59 PM

शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याला जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी जामीन आदेशही जारी करण्यात आला आहे. त्याच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली होती.

मुंबई हायकोर्टाने दुपारी आर्यन खानला पाच पानी जामीन मंजूर केला. मात्र, त्याला एक लाखाची सुरक्षा ठेव भरावी लागणार आहे. कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला दर शुक्रवारी NCB ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या कामकाजाबाबत ते कोणतेही वक्तव्य करू शकणार नाहीत. आर्यनची सुटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे. जामीन मंजूर झाल्याची ऑर्डर लवकरच ऑर्थर रोड जेलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढच्या दोन तासात आर्यनची जेलमधून सुटका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली आहे.