खोत, पडळकर, सदावर्ते हे तिघं भाजपचे खुळखळे; कुणी केली एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्यावर टीका
VIDEO | ST कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने काँग्रेसची एसटी आंदोलक नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका
सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते हे तिघे गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरले होते. मात्र या तिघांवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी एसटी आंदोलकांच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी मैदानात उतरलेले सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते या त्रिमूर्तींनी भाजपकडून महाविकास आघाडीला बदनाम करण्याची सुपारी घेतली होती. महाविकास आघाडीची कशी बदनामी होईल, याकरता या तिघांना दिल्लीतील भाजपकडून सुपारी मिळाली होती. हे तिन्ही नेते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे खुळखुळे आहेत. भाजप जेव्हा आवाज उठवायला सांगते तेव्हा हे खुळखुळे वाजतात. या तिघांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाशी काही देणे घेणे नाही. यांना केवळ राजकारण करायचे होते. या नेत्यांना मतांसाठी एसटी कर्मचारी हवे होते त्यांचे सुख दुःख, विकास यांच्याशी काही देणं घेणं नाही, मागील सात महिन्यांपासून यांचं सरकार आहे मग या नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज का उठवला नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.