सत्तेचा उपभोग घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, कालिचरण महाराज यांची कोणावर टीका?

सत्तेचा उपभोग घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, कालिचरण महाराज यांची कोणावर टीका?

| Updated on: Jul 15, 2023 | 10:29 AM

त्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सर सत्तेत आता तीन वाटेकरी झाले आहेत. यावरून कालिचरण महाराज यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपला उपमुख्यमंत्री तर इतर ८ नेत्यांना मंत्री पदाची शपथविधी घडवून आणला. त्यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सर सत्तेत आता तीन वाटेकरी झाले आहेत. यावरून कालिचरण महाराज यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. कालिचरण महाराज यांनी, आपली विचारधारा सोडून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेसोबत येणे म्हणजे फक्त सत्ते येण्यासाठी आणि बसण्यासाठी केलंल काम आहे. तर जे नास्तिक लोक आहेत ते धार्मिक लोकांसोबत केवळ सत्तेत बसण्यासाठी जात आहेत अशी घणाघाती टीका केली आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी आता शरण कोणा जावे, सत्य कोणा ते मानावे अशी समाजाची अवस्था झालीय असे म्हणताना आपल्या विचारधारेला समर्पित लोक आहेत त्यांनी सत्तेत येणे गरजेचे आहे आणि आपण त्यांनाच मतदान करू असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 15, 2023 10:29 AM