कल्याणनंतर आता भिवंडी हादरली…. आधी बेपत्ता अन् निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, मृतदेह आढळताच….
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजेपासून बेपत्ता होती. या संदर्भात पालकांनी पोलिसांना तक्रार दिली आणि नंतर....
भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जन स्थळी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजेपासून बेपत्ता होती. या संदर्भात पालकांनी पोलिसांना तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. या अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत असतानाच मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जन स्थळी आढळून आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून तिच्यावर अत्याचार सुध्दा केल्याची माहिती मिळत आहे. कल्याण व परिसरात मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना ही दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.