Kalyan Crime : कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी; वकील संजय धनके काय म्हणाले?

Kalyan Crime : कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी; वकील संजय धनके काय म्हणाले?

| Updated on: Jan 02, 2025 | 5:54 PM

कल्याणच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांना धमकी देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.

कल्याणच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या वकिलांना धमकी देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी सातत्याने धमकी येत असल्याचा दावाही केला आहे. “मी बदलापूर अल्पवीय मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं वकीलपत्र घेतलं तेव्हाही मला सामाजिक कार्यकर्त्यांनी धमकी दिल्या की, वकीलपत्र घ्यायचं नाही म्हणून. शेवटी संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला आहे. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष असतो. असं नाही की कुणाला वकीलपत्र देता येत नाही किंवा घेता येत नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे मी वकीलपत्र टाकलं. पण काही लोकांनी धमक्या दिल्या”, असे वकील संजय धनके म्हटले तर अक्षय शिंदे याच्या बाबतीत दिल्या. कल्याण मारहाण प्रकरणातील अखिलेश शुक्ला यांच्या बाबतीतही दिल्या की, मराठी माणूस असून तू असं करतोय म्हणून. अक्षय शिंदे बरोबर चार माणसं मराठी होते हेही आपल्याला नाकारता येत नाही, अशी भूमिका वकील संजय धनके यांनी मांडली. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले?

Published on: Jan 02, 2025 05:54 PM