कल्याणमध्ये बैलांच्या जीवाशी खेळ, आगीवरुन चालवण्याचा धक्कादायक प्रकार
कल्याणमध्ये आगीवरुन बैल चालवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
कल्याणमध्ये आगीवरुन बैल चालवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण ग्रामीणमधील आंबे गावात तर कल्याण पूर्व काटेमानिवली चिंचपाडा भागात हा थरार केला गेला आहे. यात दिसत आहे की, एककीकडे गवत पेटवून तर दुसरीकडे फटाके लावून लोक जनावरे आणि स्वत:चा जीव धोक्यात घालत आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनेची गंभीर दखल घेत हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे तपासून कारवाई कारवाई केली पाहिजे,अशी मागणी कल्याण मधील वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या प्राणी मित्रंकडून होत आहे.
Latest Videos