Kalyan Loksabha Election Exit Poll 2024 : कल्याण कुणाचे? एक्झिट पोलचं दान कुणाच्या पदरात?; श्रीकांत शिंदे की…
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झालेत. त्यामुळे राज्यात १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. कल्याण लोकसभा निवडणूक मतदारसंघात आधीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे कल्याणची जागा नेमकी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली होती. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झालेत. त्यामुळे राज्यात १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. कल्याण लोकसभा निवडणूक मतदारसंघात आधीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे कल्याणची जागा नेमकी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. त्यादरम्यान, शिंदे गट शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोण लोकसभा लढणार यासाठी बराच कालावधी गेल्यानंतर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांनी तिकीट दिली. तर दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार देखील झाला मात्र आता विजय कोणाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे. मविआ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.