Kalyan Rada : धूप-अगरबत्ती लावण्यावरून किरकोळ वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर अधिकाऱ्यांचं निलंबन

Kalyan Rada : धूप-अगरबत्ती लावण्यावरून किरकोळ वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर अधिकाऱ्यांचं निलंबन

| Updated on: Dec 20, 2024 | 10:10 PM

गुरूवारी कल्याण येथील योगीधाम परिसरातील उच्चभ्रू परिसरातील किरकोळ कारणावरून देशमुख कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातच राहून मराठी माणसांवर दादागिरी, शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाचा अपमान करून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणी प्रकरणात अखेर या मुजोर एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला यांचं निलंबन झालंय. गुरूवारी कल्याण येथील योगीधाम परिसरातील उच्चभ्रू परिसरातील किरकोळ कारणावरून देशमुख कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातच राहून मराठी माणसांवर दादागिरी, शिवीगाळ आणि मारहाण झाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. माजुरड्यांचा माज उतरवणार, मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अखिलेश शुक्ला याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो स्वतःपोलिसांच्या समोर आला आणि स्वतःच व्हिडीओ शूट करत उलट्या बोंबा मारत माझ्याच पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला. मराठी माणसाचा अपमान आणि मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्यांचं निलंबन करून ठिकाणावर आणलंपण. मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 20, 2024 10:10 PM