Kalyan Rada : मराठी कुटुंबाला पुन्हा बेदम मारहाण, ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर…
पुन्हा एकदा कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयाकडून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याबाबतचा जाब विचारला असता एका परप्रांतीयाने मराठी कुटुंबाला मारहाण केली.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयाकडून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याबाबतचा जाब विचारला असता एका परप्रांतीयाने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या मारहाणीत मराठी तरूण जखमी झालाय तर त्याच्या आईला आणि पत्नीला मारहाण झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडूनही याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. कल्याण पश्चिमेत दोन दिवसांपूर्वीच देशमुख कुटुंबाला एका परप्रांतीय कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी देशमुख कुटुंब उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे. पोलीस आरोपींना मदत करताय असा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केलाय. गेल्या गुरूवारी कल्याण येथील योगीधाम परिसरातील उच्चभ्रू परिसरातील किरकोळ कारणावरून देशमुख कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणी प्रकरणात अखेर या मुजोर एमटीडीसीचा अधिकारी अखिलेश शुक्ला यांचं निलंबन झालंय.