Kalyan marathi family Rada : कल्याण राड्यातील मुख्य आरोपी म्हणाला, 'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...',

Kalyan marathi family Rada : कल्याण राड्यातील मुख्य आरोपी म्हणाला, ‘माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी…’,

| Updated on: Dec 20, 2024 | 5:54 PM

कल्याण पश्चिम येथील अजमेरा इमारतीत झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अखिलेश शुक्ला यांनी झालेल्या वादावर आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

कल्याण पश्चिम येथील अजमेरा इमारतीत झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे. अखिलेश शुक्ला यांनी झालेल्या वादावर आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. आपल्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले, असे त्यांनी सांगितलं. पुढे त्याने आत्मसमर्पण करताना असं म्हटलं की, एका वर्षाआधी मी माझं घरचं इंटेरियर केलं आणि इंटेरियरमध्ये मी चप्पल-बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या बाजूहून उजव्या बाजूला केला. त्यानंतर देशमुख कुटुंब ज्यांचा प्लॅट क्रमांक 404 आणि कलकुट्टे कुटुंब ज्यांचा फ्लॅट क्रमांक 403 आहे, या दोघांनी खूप आक्षेप घेऊन वाद घातला. ते आम्हाला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होते की, हा रॅक तुम्ही इकडे का केला आहे म्हणून. तुम्ही तो रॅक तिकडेच लावा नाहीतर आम्ही त्याला तोडून फेकून देणार. ही लोकं मला आणि माझी पत्नीला एक वर्षापासून खूप त्रास देत होते. दररोज शिवीगाळ करणे, उलटसुलट बोलणे सुरु होते. माझी पत्नी दररोज मला ऑफिसमधून आल्यानंतर सांगत होती. तरीही मी या मुद्दावर बोललो नसल्याचे अखिलेश शुक्ला याने सांगितले.

Published on: Dec 20, 2024 05:53 PM