आईच्या मृतदेहाजवळ 14 वर्षांचा मुलगा 2 दिवस होता बसून पण..; कल्याणमधील मन सुन्न करणारी घटना

आईच्या मृतदेहाजवळ 14 वर्षांचा मुलगा 2 दिवस होता बसून पण..; कल्याणमधील मन सुन्न करणारी घटना

| Updated on: Aug 02, 2024 | 3:49 PM

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारती मध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे तिच्या 14 वर्षाचा मुलाला आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली आणि हृदय हेलावून टाकणारी घटना उघड झाली .

सेल्विया डेनीयल ही महिला पती डेनीयल आणि 14 वर्षाचा मुलगा ऑलविन सोबतकल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथील सुंदर कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. दोन दिवसापूर्वी सेल्विया यांचे पती कामासाठी काही दिवसानिमित्त बाहेर गेले होते. सेल्विया आणि ऑलवीन हे घरात होते. घरात झोपलेल्या सेल्विया यांचा झोपेतच मृत्यू झाला. मात्र त्याची कोणालाच माहिती नाही. दोन दिवसानंतर घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी खडकपाडा पोलिसांनी माहिती दिली. शेजारी राहणाऱ्यांनी, पोलिसांनी दार ठोठावले. मात्र आतून काही प्रतिसाद येत नव्हता. अखेरीस पोलिसांनी प्रतिसाद येत नसल्याने घराचे दार तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी आत प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. घरात एक महिला मृतावस्थेत पडून होती. तिच्या शेजारी एक मुलगा बसला होता. महिला सेल्विया ही झोपत मृत्यूमुखी पडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तिच्या शेजारी तिचा मुलगा ऑलविन दोन दिवसापासून बसून होता. त्याला आईचा मृत्यू झाला हे कळले नाही. पोलिसांनी मुलाची प्राथमिक विचारपूस केली असता त्याची मनस्थिती ठिक नसल्याने त्याने काही प्रतिसाद पाेलिसांना दिला नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे? याचे कारण समोर येणार आहे.

Published on: Aug 02, 2024 03:49 PM