kangana Ranaut | पासपोर्टप्रकरणी कंगनाला दिलासा नाही, याचिकेवरील सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब

kangana Ranaut | पासपोर्टप्रकरणी कंगनाला दिलासा नाही, याचिकेवरील सुनावणी 25 जूनपर्यंत तहकूब

| Updated on: Jun 15, 2021 | 2:03 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली. या सुनावणीनंतर हा निर्णय तिच्या बाजूने असेल, असे कंगनाला वाटले, पण तसे झाले नाही. कंगना रनौत यांना कोर्टाकडून धक्का मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली. या सुनावणीनंतर हा निर्णय तिच्या बाजूने असेल, असे कंगनाला वाटले, पण तसे झाले नाही. कंगना रनौत यांना कोर्टाकडून धक्का मिळाला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच व्हावी अशी कंगनाची इच्छा होती, परंतु कोर्टाने तसे करण्यास नकार दिला आणि तिला नवीन याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगना रनौत यांनी दाखल केलेली तत्काळ सुनावणी याचिका अस्पष्ट आहे.