रोहित पवार यांना मोठा धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त, काय आहे प्रकरण?
ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर | 8 मार्च 2024 : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. या कारवाईमुळे रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्न सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
Published on: Mar 08, 2024 06:46 PM
Latest Videos