‘अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करणार, त्यांच्यासोबत राज ठाकरे…’, रोहित पवार यांचं मोठा दावा
'दिल्लीवरून फर्मान आलं असावं, आता आपलं कुठलेच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना. तर मग तिसरी आघाडी काढू. अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार घेईल. त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील', असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
दिल्लीचे नेते मतं खाण्यासठी काही पक्षांना उभं करतात.तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपची रणनिती आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. ते पुढे असेही म्हणाले की, अजित दादांच्या भूमिकेवरून वाटतं की, ते तिसरी आघाडी करतील तर या तिसऱ्या आघाडीत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष देखील असण्याची शक्यता असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. या तिसऱ्या आघाडीचं काम मते खायची असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेतायेत. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला तर या तिसऱ्या आघाडीत मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील, असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.