काहीही झालं तरी पुढच्या निवडणुकीत ‘ही’ व्यक्ती निवडून येणारच; मंत्री उदय सामंत यांना विश्वास
Karjat News Uday Samant : 'हा' व्यक्ती पुन्हा आमदार म्हणून निवडून येणारच, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
कर्जत :“कोणी आरोप प्रत्याआरोप केले. कोणी कितीही टीका केली तरी महेंद्र थोरवेच निवडून येतील”, असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. चार-चार वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडणूक आलो तरी महेंद्र थोरवे निधी आणताना ते गोड बोलतात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतो. मात्र तरिही सर्वात आवडते महेंद्र थोरवे आहेत. पालकमंत्री म्हणून महेंद्र थोरवेंचा निधी आणण्याचा क्लास घेणार आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन आला. वाढदिवसाला गेले नाही तर कागी खरं नाही. म्हणून आम्ही घाबरून इकडं आलो, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 08, 2023 11:31 AM