महाविकास आघाडीत जागावाटपाआधीच तिढा वाढला? कोणी सांगतिला कोणत्या जागेवर दावा? मविआत फुट?
लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी घोषणाच करण्यात आली. तर जागावाटपासाठी प्राथमिक चर्चाही झाल्याचे नेत्यांनी जाहिर केलं. मात्र आता जागावाटपाआधीच महाविकास आघाडीत अस्थिरता आल्याचे पहायला मिळत आहे. तर जागांवरुन मतभेद समोर आले आहेत.
मुंबई : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी कामाला लागली. मविआच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या. यानंतर लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी घोषणाच करण्यात आली. तर जागावाटपासाठी प्राथमिक चर्चाही झाल्याचे नेत्यांनी जाहिर केलं. मात्र आता जागावाटपाआधीच महाविकास आघाडीत अस्थिरता आल्याचे पहायला मिळत आहे. तर जागांवरुन मतभेद समोर आले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा सांगितलाय. तर राऊत यांच्या या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी कुठल्याही जागा वाटपाबाबत सूत्र अद्याप ठरलेलं नाही, असं स्पष्ट केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सल्लाही देताना, राऊत यांनी महाविकास आघाडीत अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये’, पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या आधीच मविआत कोणत्या जागांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट