Karnatak Assembly Election : कर्नाटक विधानसभेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू, 224 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात

Karnatak Assembly Election : कर्नाटक विधानसभेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू, 224 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात

| Updated on: May 13, 2023 | 9:40 AM

VIDEO | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू, 224 जागासाठी मतमोजणी सुरू, तगडा बंदोबस्त तैनात

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात अब की बार कुणाचं सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार बाजी मारणार का हे चित्र अवघ्या काही तासात निश्चित होईल. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागासाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत भाजपची प्रतिष्ठापणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेच्या 224 जागासाठी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त येथे पाहायला मिळत आहे. कर्नाटकात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 13, 2023 09:40 AM