तोडफोड करुन बाजूला करणं ही भाजपची संस्कृती, कर्नाटक निकालावरून कुणी केला हल्लाबोल?
VIDEO | 'ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है', असे म्हणत कुणी दिला भाजपला इशारा?
अमरावती : कर्नाटक विधानसभेवर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होतंय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर राज्यात काँग्रेसच किंगमेकर असल्याचे दिसतंय. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस रिंगणात उतरले होते. या रणसंग्रामात काँग्रेसने गड काबीज करत काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा पिछाडीवर आहे. या पक्षाला अवघ्या 70 जागा मिळताना दिसत आहेत. जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळत आहेत. यादरम्यान यशोमती ठाकूर यांनी या निकालावर भाष्य केले आहे. जनतेच्या मनात जे आहे ते कर्नाटक विधानसभा निकालातून स्पष्ट होताना दिसतंय. जातीभेद केला, ऑपेशन लोटस केलं पण निकालाच्या माध्यमातून लोकांच्या मनात आहे ते इथे दिसत आहे, असे स्पष्टपणे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. भाजपची जी पॉलिसी आहे खोटं बोल आणि रेटून बोल की आता लोकांच्या लक्षात आली आहे यांचं पितळ उघड पडलं आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करणारे जे नेते कर्नाटकात गेले ते तिथे सांगत होते की काँग्रेसचा आणि मराठी माणसाचा संबंध नाही, पण कर्नाटकच्या निकालाचे परिणाम लोकसभा निकालावर दिसतील ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत भाजपला यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे.