Karnataka Election Result | काँग्रेसची घोडदौड सुरुच, भाजप-जेडीएसच्या जागा घटल्या; अंतिम विजय कुणाचा?
VIDEO | काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार? कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल कुणाच्या बाजूने लागणार?
कर्नाटक : २०१३ साली काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या होत्या तर त्यापेक्षाही अधिक जागा यंदाच्या निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) काँग्रेला मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची घोडदौड सुरुच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीएसच्या जागा घटल्याचे समोर येत आहे. भाजप ६८ तर जेडीएस २२ जागांवर आहे तर काँग्रेस सर्वाधिक म्हणजे १२७ जागावर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये निवडणुकीमध्ये काँग्रेला इतक्या जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. २०१३ साली काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या होत्या तर भाजप ४० आणि जेडीएस ४० इतक्या जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत १२७ जागा मिळाल्याने काँग्रेसची घौडदौड सुरू आहे. या सगळ्या अकड्यांवरून काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी वाटचाल करताना दिसतेय. दरम्यान, कर्नाटक हे राज्य आपल्याकडे राखण्यासाठी भाजपने चांगलीच कबंर कसली होती. विकासाचा मुद्दा, योजना त्यांनी या राज्यात मांडला होता मात्र त्याचा कोणताही फायदा या ठिकाणी झाला नसल्याचे पाहायला मिळत आहे.