Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपला बहुमत मिळेल अन्… ‘या’ मंत्र्यानं केला मोठा दावा
VIDEO | कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत या मंत्र्यानं केला विश्वास व्यक्त म्हणाले, भाजपला बहुमत मिळेल अन्...
भंडारा : कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी झाली आणि या निवडणुकीची मतमोजणी आज होतेय. या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसची घौडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीचा निकाल येत असताना काँग्रेस आघाडीवर आणि भाजप पिछाडीवर असेल तरी, निवडणुकीच जोपर्यंत शेवटच बूथ मतमोजणी होत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. आम्हाला अजूनही आशा आहे, कर्नाटकात भाजप नक्कीच बहुमातापर्यंत पोहचेल आणि भाजपचं सरकार येईल, अशी आशा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केली तर यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटक निवडणुकीवर संजय राऊत यांनी, हा प्रभाव मोदींचा असून भाजपच्या डोक्यात हनुमलमानानं गदा मारल्याची टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देतात भागवत कराड म्हणाले, संजय राऊत यांची नेहमी बडबडं चालू असते, त्या बडबडीकडं जनता फारसं लक्ष देत नाही आणि आम्ही पण लक्ष देत नाही, असे भाष्य करत राऊत यांच्या विधानाची कराड यांनी हवा काढून टाकली आहे.