Karnataka Elections 2023 : कर्नाटकात भाजपच्या प्रचाराचा सुपर संडे
VIDEO | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपरसंडे, विकेंडचा मुहूर्त साधत उमेदवारांचा जंगी प्रचार
कर्नाटक : कर्नाटक राज्यात येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकात ठाण मांडून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा करत शिंदेंना कर्नाटकी पद्धतीची पगडी घालून जंगी स्वागत करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपरसंडे असल्याचे आज पाहायला मिळाले. विकेंडचा मुहूर्त साधत अनेक उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसताय. म्हणून कर्नाटकात जागोजागी उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅली निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी जनतेने देखील निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना उत्स्फुर्त साथ दिली. कर्नाटकात मराठी भाषिक मतदार असल्याने महाराष्ट्राचे लक्ष देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील दिग्गज नेतेही तिथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.