कर्नाटक निकालावरून अजित पवार यांचा भाजपवर हल्ला, म्हणाले, एकदम 65 वर आले…
2014 सालापासून कालच्या कर्नाटकच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय प्राप्त केला होता. त्यांनी दोन वेळा केंद्रात तर वेगवेगळ्या राज्यातली काही सरकारं ही आणली.
मुंबई : कर्नाटक निकाल लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य आलं आहे. तर भाजपच्या गोटात निराशा. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया दिला आहे. त्यांनी, 2014 सालापासून कालच्या कर्नाटकच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय प्राप्त केला होता. त्यांनी दोन वेळा केंद्रात तर वेगवेगळ्या राज्यातली काही सरकारं ही आणली. त्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या भाजप पक्षात साहजिकच उत्साह पाहायला मिळायचा. त्यांच्यामध्ये एक जोश पाहिला मिळायचा. त्याचदरम्यान मात्र विरोधकांची स्थितीही चिंताग्रस्त झाली होती. परंतु कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे निकाल आला, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले. काँग्रेस 100,110 पासून 115 असणारे एक्झिट पोलचे अंदाज तोडून पुढे गेली. काँग्रेसने जवळपास 135 च्यापर्यंत मजल मारली.तर भाजप हे 65 वर आली. त्यामुले साहजिकच त्यांचा एकदमच उत्साह कमी झाला आहे.