Karnataka Water Logging | कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस, गुडघाभर पाण्यातून नागरिकांचा प्रवास

| Updated on: Aug 10, 2022 | 9:58 AM

प्रशासनाने नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या एकूण 33 दरवाजांपैकी 30 दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

कर्नाटकातील विविध भागांमध्ये संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे, विशेषत: तुंगा आणि तुंगभद्रा नद्यांच्या काठी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि विजयनगरमधील पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे तुंगभद्रा धरणातून किमान एक लाख क्युसेक पाणी तुंगभद्रा नदीत सोडण्यात आले आहे. तुंगभद्रा धरणाची पाणी साठवण क्षमता 1,633 फूट असून, 1,631 फूट पाणीसाठा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. समतोल राखण्यासाठी धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने धरणाच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या एकूण 33 दरवाजांपैकी 30 दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

Kerala Periyar River Flood | केरळमधील पेरियार नदीच्या पाणी पातळीत वाढ
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कॅबिनेटमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी?